Home अहमदनगर अहमदनगर: कॉलेज तरुणीचे अपहरण

अहमदनगर: कॉलेज तरुणीचे अपहरण

Ahmednagar News:  एका कॉलेज तरुणीचे अपहरण (kidnapped) केल्याची घटना तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली.

Ahmednagar College girl kidnapped

राहुरी:  येथील एका कॉलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात नगर येथील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर येथील एका तरुणाने राहुरी येथील कॉलेज तरुणीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना 17 जुलै रोजी घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात नगर येथील एका तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेतील अल्पवयीन तरूणी टाकळीमिया येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. दि. १७ जुलै रोजी ती तरुणी कॉलेजमध्ये गेली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा कॉलेजमध्ये व परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळून आली नाही.

आपल्या मुलीला समीर शब्बीर शेख (रा. पाईपलाईन रोड, सावेडी) याने अपहरण करून पळवून नेल्याचा तिच्या नातेवाईकांना संशय आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन समीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar College girl kidnapped

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here