Home अमरावती अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

Amravati Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केल्याची घटना.

Rape of a minor girl by dragging her into the net of love

अमरावती: प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abused) केल्याची घटना अमरावतीत घडली. ऐनवेळी मुलीला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श सुरेश पोटे (रा. नांदगाव पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  पीडित मुलगी जून २०२१ मध्ये शहरातील एका व्यापारी संकुलातील दुकानात काम करीत होती. त्यावेळी त्याच दुकानात कामाला असलेल्या आदर्शसोबत तिची ओळख झाली. या काळात आदर्शने तिला प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी तो तिला एका फ्लॅटवर घेऊन गेला. जेवण केल्यानंतर त्याने तिला शारीरिक संबंधांची मागणी केली. तिने त्यास नकार दिल्यावर तो रुसून बसला. मी इतर मुलांसारखा नाही, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, तर संबंध ठेवण्यास काय हरकत आहे, असे म्हणून त्याने पुन्हा तिचे लैंगिक शोषण केले.

झालेल्या या प्रकाराबाबत खंत वाटल्याने तिने याबाबत आपल्या आईला सांगितले. यावेळी आईने तिची समजूत काढली. त्यावर १८ वर्षांची झाल्यावर तो मुलगा माझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून मुलीने आईची मनधरणी केली. त्यामुळे तिची आई आदर्शसोबत लग्न करून देण्यास तयार झाली. त्यानंतर आदर्शच्या घरी जावून लग्नाची बोलणी करण्यात आली. पीडित मुलगी ही १८ वर्षांची पूर्ण झाल्यावर तुम्ही कोर्ट मॅरेज करून टाका, असे आदर्शच्या आई व भावाने त्यावेळी म्हटले. त्यामुळे पीडित मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला.

वाढदिवसाआधी आदर्श हा भांडण करून कुठे तरी निघून गेला. त्यावेळी तो दारू पिऊन रस्त्यावर पडून असल्याची माहिती तिला मिळाली. दरम्यान, त्याने सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्याला फोन कॉल करू नकोस, असे तिला त्याच्या आईने बजावले. काही दिवसांनी आदर्शने लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला एका ठिकाणी बोलाविले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ती अमरावतीत आली. त्यावेळी आदर्शने न्यायालयात कागदपत्रांची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यावर अचानक मी लग्न करू शकत नाही, असे पीडित मुलीला म्हटले. त्यामुळे पिडीत मुलीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Rape of a minor girl by dragging her into the net of love

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here