Home क्राईम संगमनेरात मारूती व्हॅन मधून गोमांस जप्त

संगमनेरात मारूती व्हॅन मधून गोमांस जप्त

Sangamner Crime: मारूती व्हॅनमधून गोमांसाची वाहतूक करताना शहर पोलिसांनी मारूती व्हॅन पकडली असून एकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त (seized).

Beef seized from Maruti van in Sangamner

संगमनेर: संगमनेर शहरातील जमजम कॉलनी गल्ली नंबर ९ येथून मारूती व्हॅनमधून गोमांसाची वाहतूक करताना शहर पोलिसांनी मारूती व्हॅन पकडली असून एकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार दि. १८ जुलै रोजी रात्री अकरा वाजता केली.

शहर पोलिसाकडून मिळालेली माहिती अशा, महाराष्ट्रात गोवंश हत्या बदा कायदा लागू असताना देखील मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुनाजीर आलम शेख रा. भारतनगर हा जमजम कॉलनी येथून तीनशे किलो गोमांस मारूती व्हॅनमधून घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी मारूती व्हॅन पकडली आहे. एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित कुम्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुनाजीर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही.जी खाडे करत आहेत.

Web Title: Beef seized from Maruti van in Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here