Home नाशिक सिन्नर: समृद्धी महामार्गावर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोन जण ठार

सिन्नर: समृद्धी महामार्गावर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोन जण ठार

Sinner News: स्विफ्ट कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन जण ठार.

Two killed in swift car accident on Samriddhi highway

सिन्नर: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि. 19) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत.  सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात हा अपघात झाला.

महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर नाशिक बाजू कडून शिर्डी बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-14 EY-7198 हिचेवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या भीषण अपघातात चालक हर्षल भोसले व श्रीकांत पोरात (श्रीरामपूर) हे दोघे जागीच मृत्यू झाले असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्यावरून बाजूला असल्याने वाहतुकीत कुठलाही खोळंबा झाला नाही. वावी पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two killed in swift car accident on Samriddhi highway

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here