Home अहमदनगर तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावली अन… अहमदनगर येथे फिल्मी थरार

तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावली अन… अहमदनगर येथे फिल्मी थरार

Ahmednagar Crime News:  आरोपीने पोलीसावर पिस्तुल रोखले स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार (Firing) केल्याची घटना.

Accused points a pistol at policeman In self-defense, police inspector firing at accused's feet

जामखेड: डोक्याला पिस्तुल लावून गुन्हा केल्याच्या घटना आपण चित्रपटांमध्ये पाहिल्या असतील मात्र, असाच फिल्मी थरार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे प्रत्यक्षात पहायला मिळाला आहे.  अहमदनगरच्या जामखेड येथे आरोपीने पोलीसावर पिस्तुल रोखले स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

जामखेड शहरातील तपनेश्वर येथे आरोपींनी एका तरुणाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली.

दरम्यान, आरोपी प्रताप पवारने पिस्तुल पोलीसावर रोखत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून त्याला जखमी केले. त्याचे उजवे पायाच्या पंजावर गोळी लागुन तो जखमी  झाल्यानंतर पोलीसांनी तिघांना पकडले. त्यांना अटक (Arrested) करण्यात आली असून त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील पोलिसाच्या गोळीबारात जखमी झालेला आरोपी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accused points a pistol at policeman In self-defense, police inspector firing at accused’s feet

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here