Home महाराष्ट्र ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड, जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला

ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड, जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला

बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

unfortunate death of a fireman during rescue operations

रायगड: जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून झोपेत काळाने घाला घातला आहे.  या दुर्घटनेत एकूण १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र हे बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या. नवी मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र हे मदतकार्य सुरू असतानाच अनेक अडचणी येत होत्या. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. मात्र अडचणींचा डोंगर पार करत सगळे जवान मदतकार्य करत होते. परंतु अशातच एक दुर्दैवी अशी घटना घडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं.

शिवराम ढुमणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इतर सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेतच ढुमणे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Web Title: unfortunate death of a fireman during rescue operations

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here