Home अहमदनगर पावसाचा इशारा: राज्यातील या जिल्ह्यांना पाच दिवस येलो अलर्ट  

पावसाचा इशारा: राज्यातील या जिल्ह्यांना पाच दिवस येलो अलर्ट  

Rain Alert upto 25 November in State  

Alert Rain: मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांत २५ नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जनेसह विजांच्या गडगडाटात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाउस पडण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

सध्या अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून हा पट्टा दक्षिण राजस्थान पार करून पुढे गुजरात व अरबी समुद्राच्या उत्तर पूर्व भागाकडे परतला आहे. तसेच दक्षिण कर्नाटक भागात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने या दोन्ही स्थितींचा परिणाम राज्यात अवकाळी पाउस पडत आहे.

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, बीड, नांदेड, कोल्हापूर, लातूर उस्मानाबाद या भागात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Rain Alert upto 25 November in State  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here