Home Accident News Accident: बाजार समिती संचालकांचे अपघाती निधन

Accident: बाजार समिती संचालकांचे अपघाती निधन

Shevgaon Accident death of market committee director

Accident | शेवगाव:  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय विश्वनाथ शिंदे (वय 52, रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) यांचे बोलेरो गाडी पलटी झाल्याने अपघातात निधन झाले आहे. आज रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. ते शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणुन कार्यरत होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरहून शेवगावकडे जात असतांना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर वाहनावरील ताबा सुटल्याने बोलेरो जीप पलटी झाली.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

बोलेरो पलटी झाल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी व पहाटे फिरण्यासाठी येणार्‍या लोकांनी मदतकार्य करून उपचारासाठी त्यांना तिसगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिवारावर व परिसरात शोककळा पसरली आहे.  

Web Title: Shevgaon Accident death of market committee director

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here