Home अहमदनगर अहमदनगर: पावसाने घराचे छत कोसळले, एक ठार

अहमदनगर: पावसाने घराचे छत कोसळले, एक ठार

Ahmednagar Rahuri News:   दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे (rain) घराच्या छतात पाणी मुरले, छत कोसळल्याने एकाचा मृत्यू (Death).

Rain collapses roof of house, one killed

राहुरी: तालुक्यातील उंबरे येथे मुसळधार पाऊस सुरू असताना ज्ञानदेव ढोकणे (वय ४५) यांच्या अंगावर घराचे छत कोसळल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत ज्ञानदेव ढोकणे हे गंभीर झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उंबरे गावठाण येथे ज्ञानदेव गजानन ढोकणे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे ढोकणे यांच्या घराच्या छतात पाणी मुरले. ७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उंबरे येथे दोन तास पाऊस झाला. पाऊस चालू असल्याने ज्ञानदेव ढोकणे यांच्यासह त्यांचा मुलगा घरातच होते. ज्ञानदेव ढोकणे हे पाणी पिण्यासाठी आतल्या खोलीत गेले. त्याचवेळी अचानक घराचे छत ज्ञानदेव ढोकणे यांच्या अंगावर कोसळले.

Web Title: Rain collapses roof of house, one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here