Home संगमनेर संगमनेर: घारगाव परिसरात भुकंपमापक केंद्र उभारावे – विखे

संगमनेर: घारगाव परिसरात भुकंपमापक केंद्र उभारावे – विखे

घारगाव परिसरात भुकंपमापक केंद्र उभारावे विखे

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव आणि परिसरातील गावांमध्ये सातत्याने भुकंपाच्या बसत असलेल्या धक्यांची गंभिर दखल घेवुन प्रशासनाने तातडीने भुकंपमापक यंत्र उभारावे अशी मागणी विरोधी पक्षनेते ना. राखाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांची सोमवारी घारगाव , साकुर पंचक्रोशितील ग्रामस्थांनी भेट घेवुन वारंवार बसणाऱ्या धक्यांबाबत माहीती दिली. घरगात आणि पंचक्रोशितील गावांमध्ये  मागील चार दिवसांपासुन सातत्याने सौम्य भुकंपाचे धक्के बसत असल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभित झाले आहेत. महसुल, पोलिस प्रशासनासह मेरी, नाशिक येथील भु- वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देवुन या भुकंपाच्या धक्यांबाबत माहिती घेतली आहे. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी ग्रामस्थांनी म्हणणे जाणुन घेवुन त्यांना दिलासा दिला.

विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह महसुल व पुर्नवसन मंत्री आणि मेरी, नाशिक विभागाला यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, घारगाव आणि परिसरातील गावांमध्ये २१ ऑगस्ट पासुन बसत असलेल्या भुकंपाच्या सौम्य धक्यांची नोंद नाशिक येथील मेरीच्या भुकंप मापक यंत्रावर झालेली आहे. मात्र या भुकंप प्रवण प्रदेशाची भुपृष्ट भ्रंश रेषा डहाणु ते गुजारात अशी असल्याचे मेरीच्या शास्त्रांनीच मान्ये केले असल्यामुळेच याचे गांर्भिय अधिक असल्याने भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचे संकट लक्षात घेवुन या परिसरात भुकंपमापक यंत्र उभारणे ही गरजेच निर्माण झाली आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय करावा अशी मागणी ना. विखे पाटील यांनी केली आहे.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here