Theft: सोन्याचे दागिने चोरणारा आरोपी राजूर पोलिसांच्या ताब्यात
राजूर | Rajur: राजुर येथील चांगुणा सुभाष नवाळी यांच्या राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरणारा अल्पवयीन आरोपीस राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चांगुणा बाई नवाळी यांच्या घराचा दरवाजा उघडुन घरातील बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून (theft) नेल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. चांगुणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 198/2021 भा.द.वि. कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास राजूर पोलीस करत होते. तपास करीत असताना राजुर येथील सराफ व्यवसायीकाकडे एक व्यकी सोन्याचे दागिने विक्रीसाठी घेवून आला त्यावर त्यांना संशय वाटल्याने त्यांनी याबाबत राजूर पोलीसांना माहीती कळविली. त्यानुसार पोलीसांनी नमुद व्यक्तीस ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता तो अल्पवयीन असुन सदरचे दागिने त्याने चांगुणा सुभाष नवाळी, रा. राजुर, ता. अकोले यांच्या घरुन चोरी असल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्या ताब्यातुन 25.000/- रु किमांतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याचे मनी मंगळसुत्र असा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मा. श्री मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम.. अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर मा. श्री राहुल मदने, उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पोसई, नितीन खैरनार, पोना रोहीणी वाडेकर,पोकॉ अशोक गाढे, पो काँ विजय फटांगरे यांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पो.ना. वाडेकर करीत आहेत.
Web Title: Rajur accused of theft gold jewelery arrested