स्वस्त धान्य घेऊन जाणारे चार संशयास्पद ट्रक राजूर पोलिसांनी घेतले ताब्यात
राजूर | Rajur: अकोले येथून कोल्हार घोटी मार्गे भंडारदरा दिशेने स्वस्त धान्य घेऊन जात असणारे चार ट्रक संशयावरून राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर ट्रक चालकांकडे धान्य वाहतुकीबाबतची कागदपत्रे संशयास्पद आढळून आल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी सदर चार ट्रक पोलीस ठाण्यात उभी केली आहेत.
स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांच्या संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्या सह्या नसल्याने तसेच ट्रक ह्या मुंबई पासिंग आहेत. यामुळे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, कॉन्स्टेबल देविदास भडकवाड यांनी चार ट्रक ताब्यात घेतल्या आहेत.
याबाबत तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी संपर्क करून माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्शभूमीवर आदिवासी भागातील नागरिकांना धान्य मिळत नसताना धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांना पत्र पाठवून मालाची तपासणी करून पुढील कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे.
Web Title: Rajur police have seized four suspicious trucks