Home अकोले राजूर पोलिसांची कारवाई: अवैध देशी व विदेशी दारू साठ्यावर छापा – Raid

राजूर पोलिसांची कारवाई: अवैध देशी व विदेशी दारू साठ्यावर छापा – Raid

Rajur police Raid on illegal domestic and foreign liquor stocks

राजूर |वार्ताहर| Rajur: अकोले तालुक्यातील केळुंगण येथे अवैध देशी व विदेशी दारु अड्ड्यावर राजूर पोलिसांनी छापा (raid) टाकून 69 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे.  

केळुंगण, ता. अकोले येथील नवनाथ सुरेश देशमुख हा चोरुन देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहीती राजूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केळुंगण गावात नवनाथ सुरेश देशमुख याचे घराजवळील पत्र्याच्या शेडजवळील दारु अड्ड्यावर छापा टाकला. सदर ठिकाणची झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील प्रमाणे देशी व विदेशी दारुचा 69 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गाढे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी नवनाथ सुरेश देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले) याच्या विरुद्ध राजुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भडकवाड करत आहे.

Web Title: Rajur police Raid on illegal domestic and foreign liquor stocks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here