Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलावरून दुचाकी कोसळली- Accident

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलावरून दुचाकी कोसळली- Accident

Accident two-wheeler fell off the flyover on Pune-Nashik highway

Sangamner | संगमनेर :  डबल शीट असलेल्या भरधाव वेगातील दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी नाशिक – पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील उड्डाणपुलावरून खाली कोसळून अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे.  हा अपघात गुरुवारी दि. दुपारी घडला असून यात दोघे जण जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोटरसायकल (क्र.एम.एच. १७ , बी. ई. ९०४१) वरून राजू चव्हाण (वय ३७, रा. अकोले नाका,संगमनेर) व अशोक शिंदे (वय ३२, रा. श्रीगोंदा) हे दोघे नाशिक – पुणे महामार्गाने जात होते. ते संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील उड्डाणपुलाजवळ आले असता दुचाकीवरील चालक राजू चव्हाण याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलाच्या खाली कोसळली. या अपघातात वरील दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील साळवे , योगीराज सोनवणे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Web Title: Accident two-wheeler fell off the flyover on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here