Home महाराष्ट्र संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणूक लढविण्याबाबत घेतला महत्वाचा निर्णय

संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणूक लढविण्याबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Sambhaji Raje took an important decision regarding contesting Rajya Sabha elections 2022

मुंबई | Mumbai | Rajya Sabha elections 2022: घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढविणार नाही, पण ही माघार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरिब लोकांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. ते मुंबईत पत्रकारांशी  बोलत होते.

आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असं संभाजीराजे म्हणाले

मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

Web Title: Sambhaji Raje took an important decision regarding contesting Rajya Sabha elections 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here