Rajur: राजूर पोलिसांचा छापा: दारू विक्री करताना एकास अटक
राजूर | Rajur Crime News: अकोले तालुक्यातील राजूर येथें अवैधरित्या दारू विक्री करताना एकास जेरबंद करण्यात आले आहे. राजुर गावात ग्रामपंचायतच्या मागे येथे राजेद्र यशवंत भराडे हा अवैध देशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त माहिती राजूर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे एक इसम अवैध रित्या दारु विक्री करताना आढळून आला असता त्याची झडती घेतली तर त्याच्याकडे संत्रा कंपनीची देशी दारु 180 मि.ली.च्या 87 सिलबंद बाटल्या, प्रत्येकी किंमत 60/-रु. असा 5220 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाराजूर गावात दारुबंदी असताना गावात अवैध दारू विकताना एक जण आढळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे
आरोपी राजेद्र यशवंत भराडे,वय-46 वर्षे, रा. देवठाण, ता. अकोले यास अटक केली आहे.. पो कॉ फटांगरे यांचे फिर्यादीवरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 11/2022 मुंबई प्रोव्हीशन अँक्ट 65(ई)प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे, पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असुन अधिक तपास पो ना डी. के. भडकवाड हे करत आहेत.
Web Title: Rajur police raid One arrested while selling liquor