अकोले: जावयाने केली सासरवाडीत आत्महत्या
राजूर: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुतोंडी येथील राजेंद्र देवराम आहेर वय २७ या तरुणाने गुरुवार दिनांक २१ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. राजूर येथे त्याच्या सासुरवाडीला तो पत्नीला आणायला गेला होता. त्यास नाशिक येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, राजेंद्र आहेर हा त्याच्या पत्नीला आणायला राजूर येथे सासुरवाडीला गेला होता. दिनांक २१ मार्च २०१९ रोजी ५ वाजता काही कारणावरून त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याचा मेहुणा रामेश्वर येलमामे याने त्यास राजूर येथील हॉस्पिटलमध्ये नेले व तेथून त्यास नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले रात्री ९:५१ वाजेच्या दरम्यान मृत घोषित करण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे सहायक फौजदार दुसाने याची पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
Website Title: rajur suicide in Sasarwadi
Latest: Sangamner News, Akole News, And Entertainment News
अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.