Home अकोले अकोले: रायफल शुटिंग स्पर्धेत अभिनवच्या वसुंधरा अकॅडेमी च्या तेजा वैराळ हिस सुवर्णपदक

अकोले: रायफल शुटिंग स्पर्धेत अभिनवच्या वसुंधरा अकॅडेमी च्या तेजा वैराळ हिस सुवर्णपदक

रायफल शुटिंग स्पर्धेत अभिनवच्या वसुंधरा अकॅडेमी च्या तेजा वैराळ हिस सुवर्णपदक.

अकोले :नुकत्याच चिपळूण टी ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या विद्यमाने पार पडलेल्या डेरवण युथ गेम्स रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडमी च्या विद्यार्थ्यांविद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी दाखवत पदकांची लयलूट केली.

त्यात इयत्ता सातवीत शिकत असलेया  कु. तेजा नवनाथ  वैराळ हिने सुवर्ण पदक मिळविले तसेच  कु.श्रद्धा अशोक  वाळुंज हिने रजत पदक मिळविले तर कु आयुष्का विलास मुर्तडक हिने व इयत्ता सहावीत शिकत असलेल्या हर्षवर्धन उमेश गवंडी यांनी  कांस्य पदक मिळविले.  या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक  सचिन बोंबले   यांचे लाभले. वसुंधरा चे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर  याच्या हस्ते व  क्रीडा विभाग प्रमुख  स्वप्नील शेटे यांच्या उपस्थितीत  विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.  

Website Title: akole abhinav vasundhara Academy rayphal shooting golden girl


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here