Home अकोले राजूर गावच्या पाण्यावर गेल्या आठ दिवसांपासून शोककळा

राजूर गावच्या पाण्यावर गेल्या आठ दिवसांपासून शोककळा

राजूर गावच्या पाण्याचा प्रश्नं दिवसेंदिवस गंभीर

राजूर प्रतिनिधी:-राजूर गावच्या पाण्याचा प्रश्नं दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.”धरण उशाला कोरड घशाला.२० किमी अंतरावर असणारे भंडारदरा धरणं तर ३किमी अंतरावर असणारी राजूर गावची पाण्याची सुविधा म्हणजे पिंपरकण्याची नदी.पण भर उन्हाळ्यात भंडारदरा धरणाचा व पिंपरकने नदीच्या पाण्याचा राजूरकरांना कुठलाच फायदा होत नाही.फायदा होतो तो राजूरपासून खालच्या लोकांना.मग राजूरकरांनी कोणाचं घोड मारलं तेच काही समजत नाही.अशी परिस्थिती आज राजूर गावावर ओढवून आली आहे.राजूर गावाला पाण्याचा तुटवडा गेल्या आठ दिवसांपासून राजूर गावचे पाणी कुठे गेले काही समजेना.सूत्रांनुसार असे समजले की राजुर गावच्या पाणी थेट पाण्याच्या टाकी पर्यंत आणणारी जलविद्युतवाहिनी ही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विना पाण्याची चालू असल्यामुळे ती जळाल्याच समजल आहे.पण राजूरकरांनसमोर हे भर उन्हाळ्यात मोठे संकट उभे राहिले आहे.दरवर्षी हीच परिस्थिती याकाळात होत असते.निवडणुका आल्याकी राजूर गावचे पाणी हे आपो-आप पळत असते मग यावर काही जादूटोणा होतो की,काही भुताटकी होते की काय असे म्हणणे राजूरकरांनमधून याची प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहे.गेल्या आठ दिवसांपासून राजूर गावचे पाणी गेल्यामुळे महिला वर्गामधून मोठा संताप व्यक्त होत असून महिलांना पाणी आणण्यासाठी उन्हातान्हात इकडे-तिकडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राजूर गावच्या ग्रामपंचयातकडून पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावी अशी मागणी राजूर ग्रामस्थ करत आहेत.
          राजूर गावावर कायमच पाण्याचा अन्याय होत असतो.लेकुरवाळी असो किंवा सासुरवाशीण असो किंवा वयोवृद्ध आजी या महिलांना दूरवरून पाण्याची भटकंती करावी लागत आहे.पाण्यासाठी ग्रामस्थांना कायमच संघर्ष करावा लागत असतो,ते देखील ग्रामस्थ सहन करून शांततेच्या मार्गाने संघर्ष देखील करत असतात.अकोले तालुका हा अतिदुर्गम भाग असला तरी निसर्ग सौंदर्याने नटलेला जरी असला तरी,या तालुक्याला कायमच अश्या प्रसंगांना सामोरे जावे लागते,तालुक्यावर कायमच अन्याय होत असतो.धरण जवळ असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि शेतीचा तर त्यापेक्षा जास्त गंभीर आहे.

Website Title: Rajur village grieved for eight days


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.


आपल्या बिझनेसची जाहिरात करा ऑनलाईन. आपल्या बिझनेस, संस्था, दुकान, न्यूज ची वेबसाईट बनवा अत्यल्प दरात. आजच संपर्क करा. मोबा. 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here