Home अकोले ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत राजूरच्या सर्वोदयने मारली बाजी

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत राजूरच्या सर्वोदयने मारली बाजी

Breaking News | Akole: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी अनुक्रमे ३ लाख, ११ लाख, २१ लाख, ५१ लाख रुपये पारितोषिकांची तरतूद.

Rajur's Sarvodaya won the 'Chief Minister My School Beautiful School' competition

अकोले: राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांचा शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदाधित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातुन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्शशाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे.  शासकिय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांचेसाठी व इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना स्वतंत्रपणे पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. तालुकास्तरीय प्रथम क्रमांकासाठी ३ लाखांची तरतूद करण्यात आली असून जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी अनुक्रमे ११ लाख, २१ लाख, ५१ लाख रुपये पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे.

राजुर येथील सत्यनिकेतन संचालित गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाने तालुक्यातील शाळांना स्पर्धेत मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. शासनाने राबविलेल्या शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबविते यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली. विविध उपक्रमांची माहिती संकलित करुन शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या अॅपवर ही माहिती दिल्यानंतर सर्वोदय विद्यालयाने तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पुढील टप्पा हा जिल्हास्तरीय असून त्यानंतर राज्य स्तरीय स्पर्धेसाठी सर्वोदय शाळा निवडली जाईल का यासाठी प्राचार्य भाऊसाहेब बनकर आणि सर्व शिक्षकांचे प्रयत्न सूरु आहेत.

राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘सुंदर शाळे’ची स्पर्धा आयोजित केली आहे.  शासनाच्या शिक्षण विभागाच्या निरिक्षकांनी गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. विद्यालयाचा परिसर मोठा असल्याने येथे विविध उपक्रम राबविणे शिक्षक व विद्यार्थ्यांना शक्य होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविल्याने सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, व सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य यांनी प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उप प्राचार्य आण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक एस.आर.गिरी. व सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Rajur’s Sarvodaya won the ‘Chief Minister My School Beautiful School’ competition

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here