खंडणी मागणारी ‘ती’ तरुणी झाली गजाआड!
Breaking News | Crime: एका हॉटेल व्यावसायिकाकडे पंधरा कोटी रुपयांची खंडणी मागणारी तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.
अंधेरी: अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाकडे पंधरा कोटी रुपयांची खंडणी (ransom) मागणारी निकिता शाम दाधीच ऊर्फ किमया कपूर या तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली. ती सध्या पोलिस कोठडीत आहे.
तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्याकडे निकिता ही पर्सनल सेक्रेटरीच्या नोकरीसाठी आली होती. याच दरम्यान तिने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन केला. जवळीक निर्माण करून तिने विविध कारणे सांगून त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले होते. जानेवारी महिन्यात तिने त्यांना चहाच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले.
त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. पंधरा कोटी रुपये न दिल्यास सोशल मीडियासह कुटुंबीय, नातेवाईकांना व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.
Web Title: She’ who asked for ransom became a young woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study