Home जालना ३ मार्चला दुपारच्या लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलावे; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

३ मार्चला दुपारच्या लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलावे; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी ३ मार्चपासून जिल्हाजिल्ह्यात शांततेत रास्ता रोको होणार.

Maratha Reservation Postponing the afternoon wedding on March 3

Manoj Jarange Patil: २४ फेब्रुवारीपासून मराठा आंदोलन सलग होणार आहे. ३ मार्चपासून जिल्हाजिल्ह्यात शांततेत रास्ता रोको होणार आहेत. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतील. सकाळी ११-१२ दरम्यान रस्ता रोको होतील. ३ मार्चला लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्न कार्य असणाऱ्यांनी दुपारच्या लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी करावा असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संध्याकाळी लग्न ठेवलं तर लग्नाला येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही. लोक रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळे मराठा समाजासह इतर समाजातील बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मुहूर्त पुढे ढकलावेत. लग्नासाठी प्रत्येक जण एकमेकांच्या कार्यात सहभागी होतात. वधू वरांना आशीर्वाद देतात. ३ तारखेचं आंदोलन ठरलेले आहे. त्यामुळे ३ तारखेचं दुपारचे लग्न पुढे ढकललं तर आंदोलनात सहभागी झालेल्यांनाही लग्नात येता येईल. नवरा-नवरीलाही आंदोलनात सहभागी होता येईल असं त्यांनी म्हटलं.

लाखोंच्या संखेने एकाच वेळी एकाच ठिकाणी राज्यभरात रास्तारोको करायचा आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत करायचा आहे. ३ मार्चचे लग्न सोहळे पुढे ढकलावेत असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे.

Web Title: Maratha Reservation Postponing the afternoon wedding on March 3

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here