Home अहमदनगर अहमदनगर: मामाच्या गावी आलेल्या तरुणीवर अत्याचार

अहमदनगर: मामाच्या गावी आलेल्या तरुणीवर अत्याचार

Ahmednagar News: मामाच्या गावी आलेल्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार (Rape) केल्याची घटना.

Rape Abuse of a young woman who came to her uncle's village

पाथर्डी | Pathardi:  मामाच्या गावी आलेल्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात समोर आली  आहे.  याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून एका युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत रमेश राठोड (रा. पत्र्याचा तांडा, तालुका पाथर्डी) या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  2021 मध्ये वीस वर्षाची पीडित तरुणी मामाच्या गावी आली होती, तेव्हा अनिकेत याच्याशी तिची ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले. आपण दोघे लग्न करणार आहोत असे आमीष दाखवून अनिकेत राठोड याने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. या काळात अनिकेत याने तरुणीला मोबाईल, अंगठी अशा भेटवस्तू दिल्या. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ करीत आहेत.

Web Title: Rape Abuse of a young woman who came to her uncle’s village

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here