संगमनेर: दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणारे दोघे अटकेत
दहावी व नववीत शिकणार्या दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून मध्यरात्रीच्या वेळी त्यांच्या राहत्या घरातून पळवून शरीरसंबंध ठेवणार्या दाढ बुद्रुक येथील दोघांना पोलिसांनी अटक (Arrested).
दाढ | लोणी: दहावी व नववीत शिकणार्या दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून मध्यरात्रीच्या वेळी त्यांच्या राहत्या घरातून पळवून शरीरसंबंध ठेवणार्या राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
3 जुलै रोजी मध्यरात्री दहावीत व नववीत शिकणार्या दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची खळबळजनक घटना राहाता तालुक्यात घडली. मध्यरात्रीच ही बाब लक्षात आल्याने मुलींच्या नातेवाईकांनी सकाळी लोणी पोलिसांत खबर दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी एक पथक तयार करून शोध सुरू केला.आरोपी या मुलींना घेऊन नाशिक, घोटी येथे गेले होते व तेथून ते भंडारदर्याकडे जात होते.
घोटी- भंडारदरा या मार्गावर एका दुचाकीवर या दोन मुली आणि दोन मुलं पोलिसांना मिळून आली. आरोपी आकाश सुनील पाळंदे वय 18 वर्षे 11 महिने व हृतिक भाऊसाहेब उर्फ हावड्या मकवाने, वय 20 वर्षे (दोघे रा. दाढ बुद्रुक) यांच्या विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन शरीर संबंध ठेवणे व बाल लैंगीक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.गु.र.नं.452/2023 भादंवी कलम 363, 366, 376 (2) (श्र)(छ),पोक्सो कायदा कलम 4,6,8,10 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
Web Title: Two arrested for abducting two minor girls by luring them into marriage
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App