Home महाराष्ट्र Rape: हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत तरुणाकडून बलात्कार

Rape: हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत तरुणाकडून बलात्कार

Rape by a young man who was called to a hotel and given a narcotic

भोपाळ | Rape : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेलली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली. अकरावीच्या विद्यार्थिनी असलेली मुलीला हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून  गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्यात आला. मध्य प्रदेशातील  इंदौरमध्ये भंवरकुआं पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवरुन 22 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. भेटायच्या बहाण्याने बोलावून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मद्यपान करुन आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे,

अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील भंवरकुआं पोलीस स्टेशन परिसरात राहणारी संबंधित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिकते. तिची विनायक गिडवानी नावाच्या तरुणाशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली. हा तरुण बेराठी कॉलनीत राहत होता. हा तरुण जितका साधा-सरळ दिसत होता, तितकाच त्याचा हेतू धोकादायक होता

आरोपीने आधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकवले, नंतर मैत्रीचा गैरफायदा घेत तिला भेटायला बोलावले. तरुणाने पीडितेला हॉटेलमध्ये भेटायला येण्यास सांगितले होते. तिथेच त्याने तिला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. मात्र त्याने कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली.

मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तरुणाने दारू पिऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाबाबत अल्पवयीन मुलाचे म्हणणे आहे की, तिने पोलिसांकडे तक्रार केली.

Web Title: Rape by a young man who was called to a hotel and given a narcotic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here