Home अहमदनगर Ahmednagar: तरुणीचा विनयभंग करून फरार झालेला आरोपी अटकेत

Ahmednagar: तरुणीचा विनयभंग करून फरार झालेला आरोपी अटकेत

Ahmednagar Accused arrested for molesting young girl

Ahmednagar | अहमदनगर: तरुणीचा विनयभंग करून फरार झालेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेवराई (जि. बीड) येथून अटक केली आहे.

संदीप दिलीप कदम (वय 28 रा. डोंगरगण ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोपरगाव तालुका, लोणी, तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान कदम याने एका तरुणीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडित युवतीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 13 जानेवारी 2022 रोजी फिर्याद दाखल केली आहे.

त्याच्य विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो पसार होता. त्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार बबन मखरे, मनोज गोसावी, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, शिवाजी ढाकणे, बबन बेरड यांच्या पथकाने आरोपी कदम याला गेवराई येथून जेरबंद केले आहे.

Web Title: Ahmednagar Accused arrested for molesting young girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here