Home पुणे Rape | १७ वर्षीय मुलीला गोड बोलून शारीरिक संबंध प्रस्थापित, गर्भवती राहिल्याने...

Rape | १७ वर्षीय मुलीला गोड बोलून शारीरिक संबंध प्रस्थापित, गर्भवती राहिल्याने उघडकीस

Rape Case 17-year-old girl was sexually assaulted 

पुणे | Pune Crime: घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीबरोबर गोड बोलून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित ठेवून (Minor Girl Rape) गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी अजित बापू कांबळे रा. भोसरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना आरोपी त्यांच्या घरी आला फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या मुलीशी गोड बोलून तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबध प्रस्थापित केले. यामधून ती गर्भवती राहिली. सदर बाब तिने कांबळे याला सांगितली. तेव्हा त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. याबाबत तिने घरात सांगितले नव्हते.
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता ती २१ आठवड्याची गर्भवती असल्याचे माहिती समोर आले. त्यानंतर तिच्याकडे फिर्यादीकडे चौकशी केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. पोलीस उप निरीक्षक गादीलवाड तपास करीत आहे.

Web Title: Rape Case 17-year-old girl was sexually assaulted 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here