अहमदनगर धक्कादायक घटना ! बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीनंतर उघडकीस
Ahmednagar Rahuri rape Case: अल्पवयीन मुलीशी मोबाईलवर ओळख बदनामीची धमकी देत वेळोवेळी अत्याचार (abused). अल्पवयीन मुलगी गरोधर राहुन प्रसुती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस.
राहुरी: राहुरी तालुक्यातील कात्रड येथील अजमोद्दीन महंमद शेख (वय 28 वर्षे) या नराधामाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मोबाईलवर ओळख करून तिला बदनामीची धमकी देवून तिच्यावर नराधम आरोपीने वेळोवेळी अत्याचार (abused) केला. यातून पीडीत अल्पवयीन मुलगी गरोधर राहुन प्रसुती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पीडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी या धक्कादायक प्रकारातून सावरत थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून आरोपी अजमोद्दीन महंमद शेख याच्या विरुद्ध अत्याचार व पोस्को कायदा (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करत आरोपीला अटक (Arrested) केली.
श्रीरामपूरचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, राहुरीचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने राहुरी तालुक्यात पालकवर्गात खळबळ उडाली आहे. मुलगी अल्पवयीन तर आरोपी सज्ञान आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Rape Case Abuse of minor girl under threat of defamation
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App