Home क्राईम Rape :  नात्याला काळिमा फासणारी घटना: सक्ख्या पुतण्याने काकूवर केला अत्याचार

Rape :  नात्याला काळिमा फासणारी घटना: सक्ख्या पुतण्याने काकूवर केला अत्याचार

Rape Case:  शेतात निंदणीचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच सख्ख्या पुतण्याने अत्याचार केला.

Rape Case Aunt was abused by Sakhya's nephew

वर्धा: जिल्ह्यात धक्कादायक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वर्ध्यातील दहेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली आहे.

शेतात निंदणीचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच सख्ख्या पुतण्याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी दहेगाव पोलिसांनी नराधम पुतण्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,, वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ४५ वर्षीय महिला व तिचे जावई हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेतात पऱ्हाटीच्या पिकाला निंदण करीत होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत शेतात निंदणीचे काम केल्यावर जावई घरी जेवण करण्यास निघून गेले. पीडित महिला शेतात एकटीच होती. दरम्यान वासनांध पुतण्याने शेतात प्रवेश करुन काकूशी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. काकूने हटकले असता पुतण्याने बळजबरीने काकूवर अत्याचार केला. घाबरलेल्या काकूने पळ काढून ही बाब तिच्या सासऱ्यांना सांगितली. मात्र, तोपर्यंत आरोपी पुतण्याने तेथून पळ काढला होता.

दरम्यान, पीडितेने दहेगाव पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ अत्याचाराच्या कलमान्वये आरोपी पुतण्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीसांनी आरोपी पुतण्याचा शोध घेत अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांनी दिली.

Web Title: Rape Case Aunt was abused by Sakhya’s nephew

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here