Sangamner Raid: जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह एका जणास ताब्यात घेण्यात आले.
संगमनेर: शहरातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह एका जणास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भारत चौक येथे जुगार अडड्या सुरु असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधिकारी राजेंद्र भोसले यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. याप्रसंगी सोमनाथ अशोक पवार (रा. नवघर गल्ली, संगमनेर) हा भारत चौक येथे बुधवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कल्याण मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. त्याच्याकडून एक गुलाबी व पांढर्या रंगाचे पुस्तक त्यावर बॉलपेनने आकडे लिहिलेले व कार्बन व 1250 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलीस नाईक गजानन गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सोमनाथ पवार याच्याविरुद्ध गुन्हा (Crime) रजिस्टर नंबर 801/2022 मुंबई जुगार बंदी कायदा कलम 12(अ) प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख करत आहे.
Web Title: Gambling den raid in Sangamner at, one arrested