Home अहमदनगर अहमदनगर: विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर: विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

Ahmednagar | Shrirampur News:  पाय घसरून विहिरीत पडला असल्याची शक्यता. विहिरीत चपला दिसल्याने गळ टाकून घेतला शोध.

young man's body was found in a well

 

श्रीरामपूर:  तालुक्यातील निमगावखैरी येथील सोमनाथ बापू उंदरे (वय 32) हा तरुण त्यांच्याच शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निमगाव खैरी येथील तीनचारी परीसरातील इंद्रायणी भागवत उंदरे यांच्या मालकीची गट नं. 85 मधील विहीर पूर्णपणे भरलेली असल्याने मयत सोमनाथ हा दुपारच्यावेळी पाणी पिण्यासाठी गेला असताना पाय घसरून विहिरीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री घरी न आल्याने घरातील मंडळींनी त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने रात्री तालुका पोलीस ठाण्यात मिसींगचा तक्रार अर्ज देण्यात आला.

दरम्यान पुन्हा शोध सुरू असताना रात्री शेतात रस्त्याच्या कडेला त्याची गाडी लावलेली दिसली तर विहिरीत सोमनाथच्या चपला दिसल्याने गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता तो विहिरीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमनाथ हा घरातील कर्ता पुरुष असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे.

Web Title: young man’s body was found in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here