Home संगमनेर लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे पुण्यात निधन

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे पुण्यात निधन

Gulabbai Sangamnerkar passed away in Pune: गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी पुण्यात निधन.

Lavani empress Gulabbai Sangamnerkar passed away in Pune

संगमनेर (जि. अहमदनगर): लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी पुण्यात निधन झाले. त्या मूळच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील होत्या. दोन महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

दयाराम मोरे आणि शिवडाबाई ऊर्फ शांताबाई या दाम्पत्याच्या पोटी १९३२ मध्ये गुलाबबाई संगमनेरकर यांचा जन्म झाला होता. त्यांची आई तमाशातील उत्तम कलाकार म्हणून ओळखली जायची. दगडोबा साळी यांच्या तमाशात शिवडाबाई यांनी अनेक वर्षे काम केले होते. आपला लोककलेचा वारसा लेकीने पुढे चालवावा म्हणून त्यांनी गुलाबबाई यांना लहानपणापासून लावणी केली. शिकवायला सुरुवात केली. छबू नगरकर, बनूबाई शिर्डीकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे काही महिने लावणीचे धडे त्यांनी गिरवले. काही गोष्टी शिकल्यावर गुलाबबाई या बनूबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत दाखल झाल्या. पुढे जाऊन त्यांनी पठ्ठे बापूराव, राम जोशी, परशराम, सगनभाऊ यांच्या अनेक लावण्यांची गायकी आणि चालविला. अदाकारीचा अभ्यास केला, गुलाबबाई भारतरत्न लता मंगेशकर यांच्या लावणीसम्राज्ञी या पदवीला साजेसे संगमनेरकर नावाने संगीत पार्टीही सुरू केली.

महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यावर मुंबई दौऱ्यात गुलाबबाईंना एका नामांकित कंपनीने निमंत्रित केले होते. यासाठी संगीतकार विठ्ठल शिंदे यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. रेडिओवरही त्यांच्या लावण्या गाजल्या आहेत.

दिल्लीला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा महाराष्ट्रातून गुलाबबाईंना दिल्लीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली होती. तसेच १९६२ मध्ये संगमनेर नगर परिषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला होता. नामांकित कलावती कांताबाई सातारकर यांच्याबरोबर गुलाबबाईंनी लोकनाट्य तमाशाचा फड काही काळ चालविला.

‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी केली होती. २०१३ मध्ये अभिनेत्री कंगना रणावतसह रज्जो’ हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी काम केले होते. राज्य शासनाने गुलाबबाई  संगमनेरकर यांना ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कलेचा गौरव केला. मात्र, कोरोनामुळे सन्मान सोहळा काही होऊ शकला नाही, असेही डॉ. खेडलेकर यांनी सांगितले. गुलाबबाई यांची धाकटी कन्या वर्षा संगमनेरकर या आईचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. गुलाबबाई संगमनेरकर यांच्या निधनाबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आदींनी शोकभावना व्यक्त केली.

Web Title: Lavani empress Gulabbai Sangamnerkar passed away in Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here