Home Maharashtra News धक्कादायक! शाळेच्या शिपायानंच केला साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! शाळेच्या शिपायानंच केला साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Rape Case Five-and-a-half-year-old Chimukali was sexually abused by a school soldier

मुलुंड | Mulund: मुलुंड पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत शाळेच्या शिपायानंच साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (rape)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने संताप व्यक्त होत आहे. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणीही होत आहे.

मुलुंड पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेच्या शिपायानं पटांगणात खेळण्यास आलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हेमंत दामोदर वैती असं या 51 वर्षीय नराधम आरोपीचे  नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, काल संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास चिमुकली शाळेच्या पटांगणात खेळण्यासाठी आली होती. ही चिमुकली शाळेच्या पटांगणाच्या बाजूलाच राहते. त्यावेळी ती एकटीच मैदानात खेळत होती. शिपायाची नजर मुलीवर पडली आणि आजूबाजूला कोणीच नाही याची खातरजमा करून त्यानं तिला हाक मारून स्वतःजवळ बोलावलं. शिपायानं चिमुकलीला शाळेतील एका खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual assault)  केले. त्यानंतर पीडित चिमुकलीनं सर्व प्रकार घरी जाऊन आपल्या आईला सांगितली. तिच्या आईनं तात्काळ नवघर पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. नवघर पोलिसांनी याबाबत बाल लैंगिक अत्याचार (Sexual abused) प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ठाण्यातील त्याच्या राहत्या घरातून अटक (Arrest) केली आहे.

Web Title: Rape Case Five-and-a-half-year-old Chimukali was sexually abused by a school soldier

Previous articleमंत्री अनिल परबांवर ईडीची धाड, छापेमारी; सोमय्या म्हणतात बॅग तयार ठेवा
Next articleAccident | ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ८ जण ठार, २६ जण गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here