Home क्राईम धक्कादायक! दुचाकीवरून पळवून मुलीवर अत्याचार

धक्कादायक! दुचाकीवरून पळवून मुलीवर अत्याचार

Parbhani Rape Case: १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

Rape Case girl was assaulted by running away from a bike

देवगावफाटा (जि. परभणी): सेलू शहरातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यात  घडली. याप्रकरणी सेलू ठाण्यात  मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच दरम्यान घडली.

संगनमत करीत खाणीचा मारोती येथील शेतातून १० वर्षीय अल्पवयीन मुलगी, पीडित मुलीचा अल्पवयीन मावसभाऊ या दोघांना दुचाकीवरून जबरदस्तीने बसवून पळवून नेले. त्यापैकी मुलास वालूरमार्गे नेत कौसडी फाटा रस्त्यावर सोडून देत पीडित मुलीस कोक शिवारात नेत जबरदस्तीने अत्याचार केला. नातेवाईकांना अल्पवयीन मुलगा, मुलीस पळवून नेल्याचे समजले. यात जिंतूरच्या दिशेने त्यांना पळविल्याचे नातेवाईकांनी सेलू पोलिसांना सांगितले. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape Case girl was assaulted by running away from a bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here