Home महाराष्ट्र बापचा बनला  हैवान: पोटच्या मुलीवर सलग तीन वर्ष लैंगिक अत्याचार

बापचा बनला  हैवान: पोटच्या मुलीवर सलग तीन वर्ष लैंगिक अत्याचार

Sexual abuse: बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले.

Sexual abuse of Pot's daughter for three consecutive years

वर्धा: वर्धा जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर  आले आहे.  सलग तीन वर्ष अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली आहे.

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या एका गावात एक नराधम बापाने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार (sexual abuse) करत होता. शिवाय मुलीवरती करत असलेला लैंगिक अत्याचाराची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून पत्नीलाही मारहाण करीत असे.  मात्र, सततचा अत्याचार असाह्य झालेल्या मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितल्यामुळे हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी नराधम बाप मागील तीन वर्षांपासून स्वत:च्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. एवढंच नव्हे तर मुलीसोबत करत असलेल्या अत्याचाराची वाच्यता बाहेर होऊ नये म्हणून आपल्या पत्नीलाही मारहाण करायचा.

पीडित मुलगी ही बारावीत शिकत आहे. अखेर पीडितेने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती व चाईल्ड लाईन केंद्राला याबाबत कळविले. चाईल्ड लाईनचे थेट अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Sexual abuse of Pot’s daughter for three consecutive years

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here