Home क्राईम प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला गर्भपातासाठी झाडपाला दिला अन त्यामुळे….

प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला गर्भपातासाठी झाडपाला दिला अन त्यामुळे….

Nagpur Crime:  शेतातील शेळीपालन केंद्रात काम करणाऱ्या तरुणाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित, तरुणावर बलात्काराचा (Rape) गुन्हा

Rape Case lover gave the underage girlfriend a plant for an abortion

नागपूर : शेतातील शेळीपालन केंद्रात काम करणाऱ्या तरुणाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती चार महिन्यांची गर्भवती झाली.

प्रियकराने तिला परस्पर गर्भपातासाठी झाडपाला दिला आणि तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली. या प्रकरणी बेला पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशाल अंकुश भोडमाके (२५, बोरीमजरा, ता. उमरेड) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, , पीडित १४ वर्षीय मुलगी मोनाली (बदललेले नाव) ही मूळची भंडारा जिल्ह्यातील आहे. ती आईवडिलांसह नागपुरातील बेला शहराजवळील एका शेतातील शेळीपालन केंद्रात कामाला आली होती. आई वडील शेतातील काम आणि शेळीपालन केंद्रात काम करीत होते.

तेथेच शेतमजूर म्हणून विशाल भोडमाके हा कामाला होता. त्याची नजर मोनालीकडे गेली. त्याने तिच्याशी संबंध वाढवले. तिचे आईवडिल घरी नसताना तिच्याशी गोडीगुलाबी लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला शेतीकाम सोडून शिक्षणासाठी शहरात पाठविण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तीसुद्धा त्याच्या प्रेमात अडकली.

आईवडिल शेतात निघून गेल्यानंतर विशालने तिला केंद्रातील एका खोलीत नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर विशालने तिला वेळोवेळी जंगलात नेऊन लैंगिक शोषण केले. यातून ती गर्भवती झाली. तिसऱ्या महिन्यात तिला गर्भवती असल्याचे लक्षात आले. तिने प्रियकर विशालला कल्पना दिली.

दोघांनाही काहीही सुचत नव्हते. विशालने काहीतरी झाडपाला आणला आणि तिला खायला दिला. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे आईने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासले आणि मुलगी गर्भवती असून तिने गर्भपाताचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने मोनालीला आस्थेने विचारपूस केल्यानंतर तिने विशालचे नाव सांगितले. भंडाऱ्यातील पोलीस ठाण्यात तिच्या आईने तक्रार नोंदविली. बेला पोलिसांनी आरोपी विशालला अटक केली असून त्याने प्रेमसंबंधातून कृत्य केल्याची कबुली दिली.

Web Title: Rape Case lover gave the underage girlfriend a plant for an abortion

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here