Home क्राईम आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरु होता वेश्याव्यवसाय

आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरु होता वेश्याव्यवसाय

Pune Crime:  आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर (Prostitution Business) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई करत पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले.

Prostitution started in the name of Ayurveda treatment center

पुणे:  पुणे-सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. कारवाई करत पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. आयुर्वेद उपचार केंद्राच्या दोन्ही मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील एका इमारतीत आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सबळ पुरावे गोळा करून तेथे छापा टाकला. पोलिसांनी तेथून दोन महिलांना ताब्यात घेतले. आयुर्वेद उपचार केंद्राचे मालक आणि व्यवस्थापक यांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तेथून एक लाख 52 हजार रुपयांचे मोबाईल संच आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अशा प्रकारचे अवैध धंदे अजून कोणत्या ठिकाणी सुरु आहे, याचा पोलीस शोध घेत आहे.

काही दिवसांपूर्वी हडपसरमधील अशाच प्रकारच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. देहविक्रीसाठी आणलेल्या पीडित महिलांची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली होती.

Web Title: Prostitution started in the name of Ayurveda treatment center

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here