Home क्राईम संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीशी लग्न, चार जणांवर गुन्हा

संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीशी लग्न, चार जणांवर गुन्हा

Sangamner Crime: अल्पवयीन मुलगी आणि २९ वर्षीय मुलगा यांचे लग्न झाले, चौकशी केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल.

Marriage with minor girl in Sangamner taluka, crime against four persons

संगमनेर: अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीशी लग्न करणारा २९ वर्षीय मुलगा, त्याचे आई-वडील आणि अल्पवयीन मुलीची आई अशा एकूण चार जणांविरुद्ध गुरुवारी (दि.०४) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि.०२) तालुक्यातील कनोली येथे अल्पवयीन मुलगी आणि २९ वर्षीय मुलगा यांचे लग्न झाले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण पोपट वर्पे (वय २९), पोपट एकनाथ वर्पे, मुलाची आई (सर्व रा. कनोली) आणि अल्पवयीन मुलीची आई (रा. श्रीरामपूर) यांच्याविरोधात ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीन मुलगी आणि तिची आई श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. या मुलीचे प्रवीण वर्पे याच्याशी लग्न झाले. याबाबत ग्रामसेवक शिंदे यांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या जन्मदाखल्यावरील तारीख आणि तिचे आधारकार्डवरील जन्मतारीख याबाबत खात्री केली. त्यात मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे आढळले. त्यांनी वरील चौघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Marriage with minor girl in Sangamner taluka, crime against four persons

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here