Home अकोले अकोलेतील घटना: अल्पवयीन मुलगी गर्भवती,  तरुणास अटक

अकोलेतील घटना: अल्पवयीन मुलगी गर्भवती,  तरुणास अटक

Akole Rape News: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गर्भवती राहिल्याने आरोपीस अटक.

Rape Case physical relations with the lure of marriage. Girl pregnant

अकोले: परप्रांतीय तरुणाने तालुक्यातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गर्भवती राहिल्याने आरोपी रामशरण मनिलाल सरोज ( रा. खाचकिमई, तहसील सरोज, जि. कौशाबी रा. उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली आहे.

अकोले पोलीस स्टेशनला १४ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. तालुक्यात निळवंडे कालव्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील एका गावाजवळ कालव्याच्या कामावर असलेला उत्तरप्रदेशातील परप्रांतीय तरुण रामशरण मनिलाल सरोज याने ऑगस्ट २०२२ पासून अल्पवयीन मुलगीमाहीत असताना देखील ओळख वाढवून तिच्याशी प्रेम संबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवल्याने आरोपीपासून गर्भवती राहिली. पोलिसांनी रामशरण सरोज याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हांडोरे करत आहे.

Web Title: Rape Case physical relations with the lure of marriage. Girl pregnant.

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here