जिल्हा परिविक्षा अधिकारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Ahmednagar Bribe Case: तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी केली आहे.
अहमदनगर: गुन्हे दाखल नसल्याबाबतचा अहवाल न्यायालयात पाठविण्याकरीता तक्रारदारांकडून तीन हजार रूपयांची लाच घेताना महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश अनंतराव पाटील (वय 52 रा. बागडपट्टी, नगर, मुळ रा. सोलापूर) याला रंगेहाथ पकडल्याची कारवाई कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी केली आहे.
महेश पाटील विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील तक्रारदार यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात सन 2020 मध्ये हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने तक्रारदार यांच्याविरूध्द आणखी काही गुन्हे दाखल आहेत काय याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकारी पाटील यांना दिले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूध्द आणखी इतर गुन्हे दाखल नसलेबाबतचा अहवाल न्यायालयात पाठविणेकरिता पाटील यांनी तीन हजार रूपयाची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.
लाचलुचपत विभागाने गुरूवारी लाच मागणी पडताळणी केली असता पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सर्जेपुरा येथील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात तीन हजार रूपयांची लाच घेताना पाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Probation Officer in Anti-Corruption Department’s net while taking bribe
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App