Home क्राईम संगमनेर: नात्याला काळिमा फासणारी घटना: पोटच्या मुलीवर बापानेच केला अत्याचार

संगमनेर: नात्याला काळिमा फासणारी घटना: पोटच्या मुलीवर बापानेच केला अत्याचार

Sangamner rape News: जन्मदात्या पित्याने १५ वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (abuse) केल्याची धक्कादायक घटना.

Rape Case Pot's daughter was abused by the father himself

संगमनेर: शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शहरातील अकोले नाका परिसरात आपल्या जन्मदात्या पित्याने १५ वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना नराधम बापाने वारंवार अत्याचार केल्याचे मुलीने जवाब दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले नाका परिसरात एक कुटुंब राहते. गेल्या दहा वर्षापूर्वी आरोपी गावी पत्नी त्याचे घर सोडून निघून गेली आहे. त्यांना दोन मुले असून त्या आईने त्यांचा कोणताही विचार न करता ती मुले लहान असतानाच निघुन गेली आहे. मात्र आजीने मोलमजुरी करून त्या नातवांचा संभाळ केला. तर मुलाचा देखील संभाळ केला. दरम्यान, १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारच्या वेळी नातीने आजीला सांगितले की, माझ्या पोटात फारच दुखत आहे. आजीने मुलीस घेतले आणि थेट सरकारी दवाखाना गाठला. दवाखान्यात तपासणी करण्यात आली. मात्र पोट दुखणे थांबत नव्हते त्यावेळी आजीने तिला विश्वासात घेऊन प्रश्न विचारले असता तिने सांगितले की, गेल्या सहा महिन्यापूर्वी घरात कोणी नव्हते. तेव्हा माझ्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आला आहे.  त्यांच्या या कृत्याला आपण विरोध केला असता त्यांनी आपणास मारहाण केल्याचे व हा प्रकार कोणास सांगितल्यास घरातून हुसकावून देण्याचा दमही दिला असल्याचा तिने सांगितला. आपला बाप आपल्याला घरातून हाकलून देईल म्हणून  मी कोणाला याबाबत सांगितले नाही. आपल्या स्वतः च्या बापानेच माझ्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे सांगितले.

याप्रकरणी आजीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्या नराधम पित्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 376 (2) (आय) (एफ) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहे.

Web Title: Rape Case Pot’s daughter was abused by the father himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here