Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: तलाठी कार्यालयातील दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात  

अहमदनगर ब्रेकिंग: तलाठी कार्यालयातील दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात  

Ahmednagar Bribery Case:  तलाठी कार्यालयातील लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक.

Two in Talathi office in the net of bribery

शेवगाव: शेवगाव तलाठी कार्यालयातील लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. खरेदी केलेल्या जमीनीच्या सातबारा सदरी नावाची नोंद करण्यासाठी 18 हजार रूपये लाचेची मागणी) केल्या प्रकरणी शेवगाव तलाठी कार्यालयातील संगणक ऑपरेटरसह खासगी व्यक्तीस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

संगणक ऑपरेटर विजय धनवटे व आरिफ पठाणे असे खासगी व्यक्तीचे नाव अटक करण्यात आलेल्यांमध्ये आहे. एसीबीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी शेवगाव तालुक्यातील माळीवाडा परिसरात गट 151 मध्ये 2 गुंठे जागोची खरेदी केली होती.

या जमीनीच्या सातबारा उतार्‍यात नाव लावण्यासाठी संबंधीत दोघांनी 4 ऑक्टोंबर रोजी त्यांच्याकडे 20 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १८ हजार ठरली होती. तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात येऊन या लाच मागणीवरून दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Web Title:  Two in Talathi office in the net of bribery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here