Home अहमदनगर तरुणीला बदनामीची भीती दाखवून अत्याचार

तरुणीला बदनामीची भीती दाखवून अत्याचार

Rape Case young woman was tortured for fear of being defamed

अहमदनगर | Rape Case: महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत जबरदस्ती फोटो काढून बदनामीची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल अख्तर सय्यद रा. मुकुंदनगर अहमदनगर असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नगर सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.

नगर शहरात राहणारी तरुणी व सोहेल एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. सोहेल याने या तरुणीशी मैत्री करून तिच्या सोबत २४ एप्रिल रोजी अक्षेपार्हे फोटो काढले. त्यानंतर १९ मे रोजी सोहेल या तरुणीला नगर सोलापूर रोडवरील एका लॉजवर घेऊन गेला तिथे त्याने गोळी खाण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर सोहेल याने पिडीत तरुणीकडे पैशाची मागणी करत पुन्हा बदनामीची भीती दाखविली. त्यामुळे या तरुणीने आठ ग्राम वजनाचे दागिने आरोपीला दिले.

१७ जून रोजी सोहेल याने सोहेल याने तरुणीस जबरदस्तीने चांदबीबी महाल परिसरात नेऊन अत्याचार केला. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Rape Case young woman was tortured for fear of being defamed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here