Home अहमदनगर व्यावसाईकाकडून महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

व्यावसाईकाकडून महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

Crime news ladies mole stone by worker

श्रीरामपूर | Crime News: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरातील पेट्रोल पंप व्यावसायिक पोपट बारहाते यांनी एका महिलेचा विनयभंग व शिवीगाळ, मारहाण प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिलेने फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीनुसार, श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी टाकळीभान येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. पेट्रोल पंप परिसरात पाणी साचल्याच्या कारणातून झालेल्या वादातून ही घटना घडली. आरोपी व पिडीत महिला यांच्यात वाद निर्माण झाले आणि आरोपी बाराहाते याने पिडीत महिलेला व तिच्या सासूला शिवीगाळ व मारहाण करत धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

या महिलेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Crime news ladies mole stone by worker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here