Home संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर ते बोटा या दरम्यान खड्डेच खड्डे

नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर ते बोटा या दरम्यान खड्डेच खड्डे

many potholes on the Nashik-Pune highway between Sangamner and Bota 

संगमनेर | Sangamner: संगमनेर ते बोटा या दरम्यान नाशिक पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचते त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रविवारी सायंकाळी काही वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडल्या आहेत.नाशिक पुणे महामार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून या मार्गाची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

एका ठेकेदार कंपनीने नाशिक पुणे चौपदरीकरण काम पूर्ण केले मात्र हे काम नित्कृष्ट दर्जाचे झालेले असल्याचे समोर आले आहे. पहिल्याच पावसात महामार्गावर खड्डे पडत आहे. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले होते मात्र आता पावसाळा सुरु झाला असून टाकलेला मुरूम निघून गेल्याने पुन्हा डोळसने, बोटा, घारगाव, माहुली परिसरात महामार्गावर खड्डे पडले आहे. रविवारी झालेल्या पावसाने खड्यात पाणी साचले आहे त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात आदळून त्यांचे टायर फुटले असून, दुचाकींचे अपघात झाले आहे.

Web Title: many potholes on the Nashik-Pune highway between Sangamner and Bota 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here