Home पुणे Rape | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape of a minor girl by threatening to kill her

पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ होताना दिसून येत आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २० वर्षीय नराधम तरुणाने एका १३ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपी किरण चंद्रकांत दगडे वय ३० रा. बावधन बुद्रुक पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी व फिर्यादी यांची ओळख आहे. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपी किरण दगडे हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने मुलीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबध प्रस्थापित केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत ढिसले हे करीत आहे.

Web Title: Rape of a minor girl by threatening to kill her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here