Home अहमदनगर शेळ्या चारत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शेळ्या चारत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape of a minor girl grazing goats

अहमदनगर | Rape Case: शेळ्या चारत असलेल्या दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर निर्जन स्थळी नेत तिच्या अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबनजवळ ओढ्यात घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा वर्षांची चिमुरडी मुलगी साईबनजवळ शेळ्या चारत होती. त्यावेळी मस्तराम (पूर्ण नाव माहित नाही, रा. साईबन जवळ, निंबळक शिवार) हा तेथे आला. त्याने मुलीला जवळच एका ओढ्याकडे नेले. तेथे त्याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित मुलीने घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. तिच्यावर अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले.

त्यामुळे मुलीच्या आईने याप्रकरणी 10 डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी मस्तराम नावाच्या आरोपीविरूद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 च्या कलम चार, पाच व एम सहानुसार गुन्हा दाखल केला आहे. नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे हे करीत आहेत.

Web Title: Rape of a minor girl grazing goats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here