Home क्राईम संगमनेर: फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल फोडुन चोरी करणारे आरोपी अटकेत

संगमनेर: फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल फोडुन चोरी करणारे आरोपी अटकेत

Accused of of furniture and electronic theft mall arrested

संगमनेर | Theft Case: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथील सना फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल फोडुन त्यातील १ लाख सत्तेचाळीस हजार रुपये कीमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी १४ अॉक्टोबर रोजी चोरुन (theft) नेण्यात आला होता. याप्रकरणी घारगांव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घारगांव पोलिसांनी शिताफीने ह्या चोरीचा तपास लावून दोन चोरट्यांना मुद्देमालासह अटक अटक करण्यात आली आहेत तर आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

याबाबत घारगांव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साकुर येथील सना फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स मॉल अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यामधील नामांकित कंपनीचे दहा 32 इंची एल. ई. डी. टी. व्ही. चोरुन नेले होते. त्याबाबत घारगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 236/2021 भादंवि कलम 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तर या गुन्ह्यामध्ये एकुण 1,47,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. तर चोरीला गेलेल्या माला बाबत घारगांव पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहीती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फीरवत आरोपींना ताब्यात घेतले व  त्यांचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले बाबत कबुली दिली. तसेच 1,47,000/- रुपये चोरुन नेलेल्या माला पैकी 1,35,000/- रु. कि.च्या 09 एल. ई. डी.टि. व्ही जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोपींनी साकुर येथील किराणा मॉल व कृषी दुकानाची घरफोडी केले बाबत माहिती देवुन त्या वेळी 25,000/- रुपये किमतीची चोरलेली दुचाकीही काढुन दिलेली आहे.

तसेच इतर मालाची काय विल्हेवाट लावली त्याबाबत माहिती दिलेली आहे. आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी घारगांव पोलीस स्टेशन व इतर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केले असल्याची कबुली दिली. आरोपी संतोष रामदास जाधव (रा. गुरेवाडी पो. म्हसोबा झाप तालुका पारनेर ) याचे विरुध्द यापुर्वी पारनेर पो.स्टे. 243/2010 भा.द.वि.कलम 457, 380, 411, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत तर आरोपी भागा उर्फ भाऊ नारायण दुधवडे( रा. वारणवाडी तालुका पारनेर ) याचे विरुध्द यापुर्वी पारनेर पो.स्टे. 03/2018 भा.द.वि.कलम 457,380,411,34 प्रमाणे व नारायणगांव पो.स्टे.ला  76/2009 भा.द.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई  पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षिका श्रीरामपुर डॉ. दिपाली काळे ,  उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दसरथ वायाळ, पोलिस नाईक संतोष खैरे ,सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, नामदेव बिरे तसेच पोना/फुरकान शेख नेम, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपुर आदिंनी केली आहे.  पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष खैरे हे करीत आहेत.

Web Title: Accused of of furniture and electronic theft mall arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here