Home अकोले लग्नाचे आमिष दाखवून अकोलेतील तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून अकोलेतील तरुणीवर बलात्कार

Rape of a young woman in Akole by showing the lure of marriage

अकोले: अकोले तालुक्यातील कोहंडी येथील एका तरुणाची फेसबुकवर सातेवाडी येथील तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणाने लग्नाचे वचन देत तिच्याशी शरीरसंबंध ठेवत नंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात बलात्काराचा(Rape case) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील कोहंडी येथील किरण सुरेश दिघे रा. दिघे वस्ती राजूरजवळ हा तरुण आर्मीत कार्यरत आहे. किरण याची सातेवाडी येथील एका तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली. यातूनच मैत्री होऊन त्यांचे प्रेमात रुपांतर झाले. या प्रेमातच या मेजर किरणने मुलीला लग्न करण्याचा शब्द दिला. यातूनच त्यांनी एकमेकांच्या संमतीने शरीरसंबध ठेवले. यांच्यातील संबंध वाढत असतानाच आता मला लग्न करण्यास जमणार नाही असे किरण दिघे याने तिला सांगितले. यामध्ये तरुणीने किरण यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यात वाद वाढतच गेल्याने पिडीत तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rape of a young woman in Akole by showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here