Home नाशिक नराधमाने मावस मेहुणीला दारू पाजून केला बलात्कार- Rape

नराधमाने मावस मेहुणीला दारू पाजून केला बलात्कार- Rape

Breaking News  Nashik Crime: युवतीला फिरण्याच्या बहाण्याने रिसोर्टवर नेले आणि दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना.

rape of sister in law by sisters husband after drinking alcohol Nashik Crime

नाशिक : नात्यातल्याच पीडित युवतीला फिरण्याच्या बहाण्याने रिसोर्टवर नेले आणि दारू पाजून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार घडला आहे.

पीडितेचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ३२ वर्षीय दळवी नामक संशयिताविरोधात दिलेल्या पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताचे स्टील रिटेलिंगचा व्यवसाय असून, संशयिताची मावस मेहुणी असलेली पीडिता त्याच्याच कार्यालयात नोकरीला होती. जुलै २०२२ मध्ये संशयिताने तिला फिरण्याच्या बहाण्याने घोटी परिसरातील विवांत रिसोर्टवर नेले. त्याठिकाणी त्याने बळजबरीने तिला दारू पाजली.

त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने अश्लिल फोटो व व्हिडीओ काढले. त्याआधारे काही दिवसांनी तिला अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले आणि मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

तसेच, त्याने तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ व धमकी दिली. त्याचा छळ असह्य झाल्याने पीडित तरुणीने पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली.  त्यानुसार मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: rape of sister in law by sisters husband after drinking alcohol Nashik Crime

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here